दादरमधील जगन्नाथ सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळाचा ‘मॉडेल पार्किंग’ म्हणून विकास होणार !

दादरमधील जगन्नाथ सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळाचा ‘मॉडेल पार्किंग’ म्हणून विकास होणार !
View this post on Instagram
सार्वजनिक वाहनतळांच्या सक्षमीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विशेष उपक्रम
पथदर्शी प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबई महानगरात सर्वत्र राबविणार
सार्वजनिक वाहनतळांचा वापर वाढावा आणि वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेने दादर पश्चिम येथील जगन्नाथ सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळ ‘मॉडेल वाहनतळ’ म्हणून विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या वाहनतळावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, अतिरिक्त प्रकाशव्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला वाहनचालकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांसाठी मासिक पास शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ४०० सवलतीचे पास दिले जाणार आहेत. त्यानंतर मागणी आल्यानंतर स्वतंत्रपणे विचार करण्यात येईल. ‘नो पार्किंग’ क्षेत्र स्पष्टपणे दर्शविण्यासाठी रस्त्यांवर लाल-काळे पट्टे रंगविण्यात येत आहेत. तसेच सम-विषम दिनांकानुसार पार्किंग व्यवस्थेसाठी लाल व पांढरे पट्टे रेखाटले जात आहेत. वाहनतळाची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी दिशादर्शक फलकांची संख्याही वाढविण्यात आली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास, हा पथदर्शी प्रयोग महानगरातील इतर सार्वजनिक वाहनतळांवरही राबविण्यात येणार आहेत.
मुंबईत वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनतळ व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. नागरिकांना अधिकृत आणि सुरक्षित वाहनतळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण महानगरात वाहनतळांची सुविधा विकसित केली आहे. महानगरपालिकेकडे विविध ठिकाणी हस्तांतरित झालेल्या एकूण ३७ वाहनतळांमधून एकूण ३० हजार १३५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ सावंत मार्गावरील वाहनतळात ‘मॉडेल पार्किंग’ उपक्रम राबविला जात आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर म्हणाले की, वाहनचालकांच्या सोयीसाठी जगन्नाथ सावंत मार्गावरील वाहनतळात १ हजार तीनचाकी व चारचाकी तसेच १२ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. कोतवाल गार्डनसमोरील परिसर, कबुतरखाना, गणेश पेठ गल्ली तसेच टी. आर. सावंत मार्ग ते बाल गोविंददास मार्ग हा परिसर पूर्वीपासूनच ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात सध्या २०० हून अधि



