All NewsmarathiMarathi News

NAVI MUMBAI : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळणार का?; भारती पोवार यांनी व्यक्त केली शंका

NAVI MUMBAI : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळणार का?; भारती पोवार यांनी व्यक्त केली शंका

ANC : लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मात्र, दि. बा. पाटील यांच्या आंदोलनातील सहकारी भारती पोवार यांनी या मागणीबाबत शंका व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी आश्वासने देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळेल याची खात्री नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या विमानतळाला अन्य नाव देण्याची शक्यता असल्याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, विमानतळ नामकरणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलन आणि उपोषणे सुरू असून हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

Related Posts

1 of 15,977

Discover more from Gallinews India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading